Monday, September 28, 2026
spot_img
Home क्राईम Chakanmidc : चाकण एमआयडीसीत रीलबाजी करणाऱ्या चार तरुणांवर गुन्हा दाखल.

Chakanmidc : चाकण एमआयडीसीत रीलबाजी करणाऱ्या चार तरुणांवर गुन्हा दाखल.

0
32
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून चार वाहने जप्त. Chakanmidc

Chakanmidc

चाकण प्रतिनिधी दि.८-

चाकण एमआयडीसीत नवीन आलिशान वाहनाची रिल काढणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले. मुंबई-बंगळुर महामार्गावर वाकड परिसरात रिल काढण्यासाठी महामार्गावरील वाहतूक रोखली होती. त्यानंतर चाकण एमआयडीसीमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती. Chakanmidc

नेमकी घटना काय?

दिनांक ०३/०९/२०२६ रोजी १९.१५ वा. सुमारास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत चाकण एमआयडीसीत अंतर्गत असणाऱ्या संत तुकाराम चौक ते मिंडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन फॉर्च्यूनर वाहनाची कॅमेरा व ड्रोनद्वारे रिल्स काढत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर व्हिडीओ काढत असताना मार्गावरील इतर वाहने रोखून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. Chakanmidc

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई. 

सदर व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेत पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम तयार केली. पोलीसांच्या तपास पथकाने विश्वासू बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजचे आधारे तपास करुन व्हायरल व्हिडीओमधील चार वाहने जप्त करून वाहनचालकांना अटक केली. Chakanmidc

पोलिसांकडून चार वाहने जप्त.

व्हायरल व्हिडोओ मधील फॉर्च्यूनर (क्र. एमएच १४, एनएन ०००५), महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. एमएच १४, ईसी १६५८), मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. एमएच १४ एचडब्लू ४७०८), व मारुती सुझुकी फ्राँक्स (क्र. एम एच १४ एल एल २५२०) अशी एकूण चार वाहने जप्त केली. Chakanmidc

चार वाहनचालकांना अटक.

१) राम हिरामण राऊत, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे,

२) साहिल बारकु जांभळे, रा. वासुली, ता. खेड, जि. पुणे,

३) आदित्य कैलास निखाडे, रा.भांबोली, ता.खेड,जि.पुणे,

४) प्रणव मालक पाचपुते, रा. वासुली, ता. खेड, जि. पुणे

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. 

संत तुकाराम चौक ते मिंडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनचालकांच्या जिवीतास व सुरक्षिततेस धोका निर्माण केला. एकमेकांची वाहन समांतर चालवून अचानक वेग कमी-जास्त करणे. वाहने अचानक थांबवत कॅमेरा व ड्रोनद्वारे व्हिडीओ बनवणे. मा. पोलीस सह आयुक्त, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. तसेच रस्त्यावर वाहन मधोमध धोकादायकरित्या थांबवून पाठीमागून जाणा-या वाहनांचा रस्ता आडवून वाहतूकीस अडथळा निर्माण केला. म्हणून चौघांच्या विरुध्द उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२६, बी. एन. एस. कलम २८५, २८१, २२३, ३(५), मोटार वाहन अधिनियम कलम १८४, १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील उपरोक्त वाहने जप्त केली असून आरोपी नं १ ते ३ यांना तात्काळ ताब्यात घेवून कायदेशिर कारवाई करण्यात आली. Chakanmidc

Chakanmidc

पोलिसांची दमदार कामगिरी.

सदरची कारवाई ही विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), डॉ. शशीकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त), बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग), गुन्हे), श्वेता खेडकर (पोलीस उप आयुक्त परि-४), प्रिया डमाळे (सहा. पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि घाडगे, पोउनि खेतमाळीस, पोहवा वडेकर, पोहवा मुळे, पोशि वायकर, पोशि कदम, पोशि गणेश गायकवाड, पोशि शुभंम खंडागळे, पोशि मंगेश घोलप यांनी मिळून केली आहे. Chakanmidc

हे ही वाचा.

पुणे जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत: प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची संधी.

https://rbpnews.com/news/pune_jilhyat_12_sptembrla_rashtriiy_lok_adalt_prlmbit_prkrne_nikalii_kadhnyachii_smdhii_3

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here