Homeलोकल न्यूजB.R.AMBEDKAR JAYANTI : भिमजयंती निमित्त आढावा बैठक संपन्न

B.R.AMBEDKAR JAYANTI : भिमजयंती निमित्त आढावा बैठक संपन्न

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शक सूचना

चाकण दि.१२ – महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन (ता.खेड) येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिम्मित घेण्यात आलेली आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.  पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध गावातील कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी कुरुळी, निघोजे, येलवाडी, खराबवाडी या गावातील भिम अनुयायी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक ढमाळ यांनी जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना केल्या.

  • आक्षेपार्ह बॅनरबाजी टाळावी.
  • मिरवणूकी दरम्यान वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  •  समाजउपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत.
  • अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिमसैनिकांची नेमणूक करावी.
  • डीजे, लेझर लाईटचा वापर टाळावा.
  • पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
  •  ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आहे त्यांनी आचार संहितेचे पालन करावे.

अशा विविध विषयांवर चर्चा करून सूचना करण्यात आल्या. यावेळी पोलीस हवालदार नवनाथ लोंढे, शाहनवाज मुलानी, पोलीस पाटील प्रदीप गायकवाड, माजी सदस्य नवनाथ म्हस्के, विजय भोसले, विनायक टोपे, पांडुरंग शिंदे, आदित्य शिंदे व जयंती कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments