सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून बाबासाहेबांस अभिवादन
चाकण दि.१९ – विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती महात्मा फुले नगर, चाकण (ता.खेड) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सिध्दार्थ सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून भिमजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नियोजित कार्यक्रमाप्रसंगी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव, नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे, गटनेते साहेबराव कड, नगरसेवक आकाश जाधव, अनिता श्रीराम घोगरे, आरती प्रीतम परदेशी, प्रेम जगताप, रणजीत जरे, मंगेश कांडगे, रुपाली राहुल कांडगे, साधना दिपक गोरे, जयश्री विशाल नायकवाडी उपस्थित होते. मालिनी प्रितम शिंदे, भगवान मेदनकर, प्रितमभाई परदेशी, राहुलदादा कांडगे, प्रितम अण्णा शिंदे, चाकण नगरपरिषदेचे अभियंता गायकवाड साहेब व विजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रसिद्ध गायिका दिक्षा वाव्हळ आणि सृष्टी नेटके यांचा दौलत निळ्या सागराची या भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सिध्दार्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष गौतम वाव्हळ, महात्मा फुले विकास मंचचे अध्यक्ष चंद्रकांत बचुटे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बचुटे, अॅड.अमर साळवे, जीवन सरवदे, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, संजय हिरवे, कार्याध्यक्ष अजय हिरवे, सचिव हरेश बनसोडे, सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते पंकज सरवदे, शाम शिंदे, प्रफुल्ल सरवदे, अतुल वाव्हळ, शाम जोगदंड, रविंद्र घाडगे, विशांत जोगदंड, कृष्णा पौळ, राहुल जोगदंड, रविंद्र म्हस्के, आकाश बचूटे, योगेश बचूटे, साहिल बचूटे, मयूर म्हस्के, भारत बनसोडे, शुभम बनसोडे, सनी जोगदंड, रोहन बनसोडे, ऋतिक बनसोडे, मयूर गालफाडे, केतन भोसले या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.