पंचायत समिती सदस्या रुपाली कांबळेंचा सन्मान. IndependenceDay

चाकण प्रतिनिधी दि.१५ –
भारत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन खराबवाडी (ता.खेड) येथे विविध उपक्रमांतर्गत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. IndependenceDay
ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण.
ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण हे प्रशासक तथा विस्तार अधिकारी एस. एस. साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजपूजन हे गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. IndependenceDay
नवमहाराष्ट्र विद्यालय ध्वजारोहण.
नवमहाराष्ट्र विद्यालयातील ध्वजारोहण हे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल मधुकर बिरदवडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश शंकर केसवड, अनंतकृपा पतसंस्थेचे संचालक शशिकांत अर्जुन कड, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य प्रशांत रघुनाथ खराबी यांच्या हस्ते करण्यात आले. IndependenceDay

प्राथमिक शाळा ध्वजारोहण.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण हे युवा उद्योजक गणेश बाळासाहेब खराबी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन सोपान धाडगे, माजी सैनिक सुरेश दगडू केसवड आणि आदर्श शिक्षिका सुनिता बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. IndependenceDay

स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रकार करून दाखवले. तसेच स्वातंत्र सैनिक व महापुरुषांच्या बद्दल भाषणे सादर केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य रूपाली कांबळे, तलाठी शाम वाल्हेकर, ग्रामपंचायत अधिकारी निलीमा जाधव, माजी उपसरपंच प्रकाश खराबी, उद्योजक अरुण सोमवंशी, मुख्याध्यापक अविनाश कड, अमोल भाटी, शिक्षकवृंद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. IndependenceDay
हे ही वाचा.
https://rbpnews.com/news/pimprii_chimchvd_aayuktaly_schin_ghate_ramdas_bartkke_yamna_seva_pdke_3














