Monday, September 28, 2026
spot_img
Home औद्योगिक CHAKANMIDC : चाकण एमआयडीसीतील कंपन्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा राज्य सरकारला कानमंत्र.

CHAKANMIDC : चाकण एमआयडीसीतील कंपन्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा राज्य सरकारला कानमंत्र.

0
12
CHAKANMIDC
राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज. CHAKANMIDC

CHAKAN

चाकण प्रतिनिधी दि. १४ –

चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी ह्या भीषण वाहतूककोंडी, जल व वायू प्रदूषण, अनियमित पाणी व वीजपुरवठा आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत. रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. असा कानमंत्र राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. CHAKANMIDC

शरद पवारांकडून महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित.

• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.

• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.

• एमआयडीसी, पीएमआरडीए, एनएचएआय आणि पीडब्ल्यूडी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.

• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी. CHAKANMIDC

महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.

– शरद पवार, राज्यसभा खासदार.

३६ हजाराहून अधिक खासगी कंपन्या बंद.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी प्रश्नाला उत्तर देताना संसदेत अशी माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या? त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का? याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नसल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.

हे ही वाचा.

https://rbpnews.com/news/nashik_phata_te_raworldurungr_elivheted_k_rid_r_nivida_15_dayamt_khasdar_amol_kolhe_yamchii_mahitii_3

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here