Chakan News इनव्हिजन एनर्जी इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे ६५ इंच टीव्ही संच.
चाकण दि.९ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी (ता.खेड) यांना इनव्हिजन एनर्जी इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे ६५ इंच टीव्ही संच भेट देण्यात आला.

सीएसआर फंडातून टीव्ही संच भेट देण्यात आला आहे. टीव्ही संचामध्ये स्कुलबिप सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये अनेक शालेय उपक्रम असल्याने शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक आर.पी.व्ही. प्रसाद, सीएफओ जॉन शेल्टन, सीएसआर प्रमुख शंकर चेल्लूरी, जनरल मॅनेजर शिव पचाडे, फॅक्टरी प्रमुख विजय बदाने, फॅक्टरी एचआर हेड सतीश मराठे, ट्रेनर स्वप्निल राठोड, मुख्याध्यापक अमोल भाटी, शालेय समिती उपाध्यक्ष अमर वाघ, सदस्य तेजस वाडेकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.