Amoldangle : भामा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह सापडला.

घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर मृतदेह सापडला.

 

चाकण प्रतिनिधी दि. ११ –

चाकण एमआयडीसीतील शेलू (ता.खेड) येथे मुसळधार पावसात वाहून गेलेल्या अमोल डांगले या तरुणाचा मृतदेह अखेर शुक्रवारी (दि.१०) पाच दिवसांनी सापडला. Amoldangle

नेमकी घटना काय? 

शेलू येथील भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून प्रवास करताना सोमवारी (दि.६) अमोल विलास डांगले (रा. कडूस, ता.खेड, जि.पुणे) हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. अखेर चार दिवसांनी गुरुवारी तरुणाचा मृतदेह हा घटनास्थळापासून अवघ्या सुमारे २०० मीटर अंतरावर चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला. Amoldangle

बचाव कार्याचे शर्थीचे प्रयत्न, पण…

सोमवारी सकाळी साडेसहा ते सातच्या शेलू ते कुरकुंडी दरम्यानच्या शेलू येथील भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत ही दुर्दैवी घटना घडली होती. चाकण एमआयडीसीतील कंपनीतील रात्र पाळी आटपून अमोल हा हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून घरी जात होता. शेलू येथील ओढ्याजवळ आला असता अचानक आलेल्या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेला. त्याची दुचाकी बंधाऱ्याजवळ सापडली होती. मात्र अमोलचा थांगपत्ता लागत नव्हता. मागील चार दिवसांपासून एनडीआरएफ पथक, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस, महसूल प्रशासन व स्थानिक नागरिक मागील चार दिवसापासून शोध घेत होते. पण मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे  शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता. Amoldangle

…अखेर शुक्रवारी मृतदेह आढळला.

अखेर पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.१०) रोजी दुपारच्या दरम्यान त्याचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत भामा नदीपात्रात घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर सापडला. Amoldangle

डांगले परिवारासह कडूस गावावर दुःखाचा डोंगर. 

अमोल डांगले याच्या आकस्मिक निधनाने डांगले कुटुंबसह कडूस गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Amoldangle

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

Leave a Comment