HomeकलाLavani : "तुम्ही थांबा ना सरकार" ह्या लावणीला प्रेक्षकांची पसंती.

Lavani : “तुम्ही थांबा ना सरकार” ह्या लावणीला प्रेक्षकांची पसंती.

३५ हजारापेक्षा जास्त व्यूज.

Lavani

खराबवाडी दि.२ : “तुम्ही थांबा ना सरकार…” ही लावणी सध्या महाराष्ट्रभर प्रचंड चर्चेत आहे. आणि अस्सल लावणी चाहते असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिपक मांडेकर यांची कलाकृती ही लावणी शौकीनांसाठी एक पर्वणीच ठरत आहे.

व्यावसायिक दर्जाचे चित्रीकरण, आकर्षक संगीत, प्रभावी सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांमुळे या लावणीला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती निर्माते, युवा कलावंत दिपक मांडेकर यांनी दिली.

Lavani

या लावणीला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजविले आहे. सुरेल संगीताची चाल ही संगीतकार ओंकार केळकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या लावणीचे बोल, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी त्रिवेणी धुरा दिपक मांडेकर यांनी सांभाळली आहे. याशिवाय, निखिल पडवळ यांनी छायांकन, तर अविनाश नलावडे यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी चोख पार पाडली आहे. मांडेकर यांनी कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा जपला आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कला, नाट्य व अभिनय क्षेत्रात सातत्याने योगदान देऊन प्रेक्षकांसाठी नवनवीन कलाकृती सादर करत असतात. ह्या लावणीला यू ट्यूब सोशल मीडियावर ३५ हजारापेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत.

लावणी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/_mHkDu9YwwQ?si=AMhuC2goKolDVbMX

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments