Homeलोकल न्यूजPune Newsभैरवनाथ व बापूजीबुवा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी.

Pune Newsभैरवनाथ व बापूजीबुवा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी.

श्री भैरवनाथ व बापूजीबुवा महाराज यांची दोन दिवसीय यात्रा

चाकण दि.२७ – चैत्र शुद्ध सप्तमीला श्री भैरवनाथ व बापूजीबुवा महाराज यांची दोन दिवसीय यात्रा खराबवाडी (ता.खेड) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी श्रींची विधिवत महापूजा करण्यात आली. मांडव डहाळे व हारतुरे वाजत गाजत महाराजांना वाहण्यात आले. सायंकाळी पालखी व छबिन्याची विद्युत रोषणाईच्या प्रकाशझोतात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री लावणी विश्वातली फुलवंती या सदाबहार लावण्यांचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. आखाड्यात विविध पैलवानांनी कुस्त्या खेळून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री सबसे हटके मिनू के झटके या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडून यात्रेची गोड सांगता करण्यात आली.

हे पण वाचा ….

लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी खुशखबर… ३००० रुपये एकदम खात्यात! अपात्र बहिणींसाठीही नवी संधी 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments