Homeलोकल न्यूज#सोसायटी निवडणूक : भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या संचालकपदी गणेश दिलीप जगताप.

#सोसायटी निवडणूक : भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या संचालकपदी गणेश दिलीप जगताप.

चाकण दि.९ –

श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, खराबवाडी (ता.खेड) च्या संचालकपदी गणेश दिलीप जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश जगताप यांची निवड ही अनुसूचित जाती प्रवर्गातून करण्यात आली आहे.

 

राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी (दि. ८) संचालकपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती संकपाळ तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सचिव रोहिदास गव्हाणे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. संचालकपदासाठी गणेश जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीची घोषणा होताच उपस्थित सभासद व पदाधिकारी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

 

यावेळी सोसायटीचे संचालक तथा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत कड, चेअरमन ज्ञानेश्वर कड, व्हाइस चेअरमन संगीता खराबी, संचालक तान्हाजी खराबी, मच्छिंद्र कड, अमृता खराबी, अर्जुन कड, नवनाथ कड, रामभाऊ खराबी, विठ्ठल बिरदवडे, मा. सरपंच सरस्वती दिलीप जगताप, चेअरमन माणिक खराबी, भरत बिरदवडे, माजी सरपंच सागर खराबी, शशिकांत कड, शिवाजी खराबी, किरण य. कड, माजी उपसरपंच रविंद्र धाडगे, किरण का. कड, श्रीपती खराबी, गणेश उल्हास खराबी, सहादू कड, कुणाल कड, प्रसाद सोमवंशी, सत्यवान कड, संकेत केसवड, धनंजय सोमवंशी, सुरज देवकर, प्रशांत खराबी, ओंकार पटेकर यांच्यासह सभासद, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments