Monday, September 28, 2026
spot_img
Home क्राईम Hit&Run : चाकण-शिक्रापूर मार्गावर थार वाहनचालकाकडून पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रकार. 

Hit&Run : चाकण-शिक्रापूर मार्गावर थार वाहनचालकाकडून पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रकार. 

0
5
Hit&Run

महिंद्रा थार वाहनचालकास अटक. Hit&Run 

चाकण प्रतिनिधी, दि. २४ :

खेड तालुक्यातील वडगाव घेणंद येथे चाकण-शिक्रापूर मार्गावर बेदारकपणे महिंद्रा थार वाहन चालवून इतर वाहनांना धडक देत नुकसान केले. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटनेचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. Hit&Run

आरोपीला अटक.

सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी निरोज रज्जाक शेख (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. Hit&Run

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी थार वाहन क्रमांक एमएच ०८ बीजी ६९८४ घेऊन चाकण चौक ते शिक्रापूर मार्गावर प्रवास करत होता. वाहन निष्काळजीपणे चालवून आरोपीने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले. यावेळी अविनाश गोविंद मोरे (वय २०, रा. मेदनकरवाडी) यांच्या तोंडाला किरकोळ दुखापत झाली. Hit&Run

यानंतर पोलिस कर्मचारी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने वडगाव घेनंद येथे पोलिसांच्या दिशेने वाहन वेगाने नेल्याचा आरोप आहे. पोलिस कर्मचारी बाजूला झाल्यानंतर आरोपीने पुन्हा सरकारी वाहनाला धडक दिली. त्यानंतर वाहन वळवून पुन्हा पोलिसांच्या दिशेने वेगाने आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत सरकारी वाहनाचे नुकसान झाले असून फिर्यादीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. Hit&Run

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल.

या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात BNS कलम १०९(१), २८१, १२५, ३२४(३), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम ३०७ चाही उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुकाळे करीत आहेत. Hit&Run

हे ही पहा. 

|| *चाकण नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी.! गणपती विसर्जनावर CCTV आणि पोलीसांची करडी नजर.

https://youtube.com/shorts/0Vz6FoftKcc?feature=share

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here