Homeसांस्कृतीकGaneshotsav : खराबवाडी येथे महिलांसाठी रंगणार "होम मिनिस्टर" कार्यक्रम.

Ganeshotsav : खराबवाडी येथे महिलांसाठी रंगणार “होम मिनिस्टर” कार्यक्रम.

महिलांसाठी भेटवस्तू जिंकण्याची संधी. Ganeshotsav

चाकण प्रतिनिधी दि. १९ –

हनुमान तरुण मंडळ, खराबवाडी (ता. खेड) यांनी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव २०२६ साठी महिलांसाठी खास “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे महिलांना विविध खेळांबरोबर आवडत्या पैठणी साडीबरोबर आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. Ganeshotsav

गणेश भक्तांकडून आकर्षक बक्षीसे.

सौ. संध्या अमर खराबी यांच्याकडून विजेत्या महिलेस एल ई डी टीव्ही संच आणि गॅसशेगडी भेट देण्यात येणार आहे. सौ. सोनल गणेश खराबी यांच्याकडून कुलर आणि मिक्सर संच भेट देण्यात येणार आहे. तर सौ. पूजा प्रशांत खराबी यांच्याकडून प्रत्येक विजेत्या महिलेस एक पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. सौ. सारिका सचिन धाडगे यांच्याकडून विजेत्या महिलेस एक इस्त्री भेट देण्यात येणार आहे. Ganeshotsav

होम मिनिस्टर सादरकर्ते.

लाडक्या वहिन्यांचे लाडके भाऊजी म्हणून प्रसिद्ध असणारे श्री. सत्यवान सहाणे आणि श्री. शुभम घाडगे हे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. Ganeshotsav

होम मिनिस्टर कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ.

हनुमान तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव २०२६ निम्मित आयोजित होम मिनिस्टर हा कार्यक्रम हनुमान मंदिर खराबवाडी येथे होणार आहे दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी वार शनिवार सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Ganeshotsav

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments