Homeलोकल न्यूजमाझी शाळा : भिमक्रांती सामाजिक संस्थेकडून शाळेस तीन फॅन भेट.

माझी शाळा : भिमक्रांती सामाजिक संस्थेकडून शाळेस तीन फॅन भेट.

  1. सामाजिक उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत भेटवस्तू.

चाकण दि. ३१ – भिमक्रांती सामाजिक संस्था यांच्याकडून खराबवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन फॅन भेट म्हणून देण्यात आले.   

भिमक्रांती सामाजिक संस्था ही नेहमीच सामाजिक व शैक्षणिक दृष्टीकोन बाळगत समाजसेवेचा वसा चालवत आली आहे. तेव्हा शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आदरातीथ्य सामाजिक बांधिलकी जपत भेटवस्तू म्हणून फॅन देण्यात आले. मुख्याध्यापक अमोल भाटी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तेजस वाडेकर आणि शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत भेटवस्तू देण्यात आली. यावेळी भिमक्रांती सामाजिक संस्था अध्यक्ष नवनाथ म्हस्के, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव सुशिल गजशिव, खजिनदार अमोल गायकवाड, सदस्य राहुल डाके, विनायक टोपे व शिक्षक वृंद उपस्थित होते. शिक्षक संतोष भुते यांनी शाळेला भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments