Homeलोकल न्यूजग्रामपंचायत वडगाव घेनंदचा जलसुरक्षा आराखड्याचा प्रकाशन सोहळा संपन्न.

ग्रामपंचायत वडगाव घेनंदचा जलसुरक्षा आराखड्याचा प्रकाशन सोहळा संपन्न.

जल सुरक्षा ही अर्थविकासाचा पाया आहे – डॉ. उमाकांत दास

चाकण प्रतिनिधी दि. २२ –

“गावांची आणि शहरांची जल सुरक्षा ही देशाच्या आर्थिक विकासाचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा पाया आहे.” असे मत गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापाठाचे कुलगुरु डॉ. उमाकांत दास यांनी व्यक्त केले.

डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्राच्या वतीने आयोजित जलसंवाद : ग्राम जलसुरक्षा कृतिकार्यशाळेचे उद्‌घाटन प्रसंगी कुलगुरू बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, जलसंकट हे देशाच्या कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करत असल्याने कृषिप्रधान देशात गावांची जल सुरक्षा ही प्राधान्याने जपायला हवी. ग्रामीण व शहरी भागांची पाणी समस्या शास्त्रीय अभ्यास करून व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडविली पाहिजे. या कृतिकार्यशाळेत विविध जलतज्ज्ञ, जलअभ्यासक आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. सतीश खाडे यांनी मार्गदर्शन करतांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा वापर करून समस्या सोडविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

जल अभ्यासक पुष्कर कुलकर्णी यांनी शाश्वत ग्रामविकास केंद्राने जलशक्ती मंत्रालयाचे जलतज्ज्ञ , सहजन व बोध संस्थेचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांचे सहकार्याने तयार केलेल्या वडगांव घेनंद या गावाच्या ग्रामजल सुरक्षा आराखड्याचे सादरीकरण केले. अशा प्रकारच्या ग्रामजल सुरक्षा आराखड्यांचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. कैलास बवते यांनी केले . त्यामध्ये शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ व युवक यांच्या मदतीने असे जलसुरक्षा आराखडे केले जातीत असे प्रतिपादन केले.

सदर कार्यशाळेत एनव्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया, महा एन.जी.ओ. फेडरेशन, जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, शिवाई संस्था सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जायन्ट्स ग्रुप ऑफ पुणे, जायंट्स वेलफेअर फौंडेशन, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ इत्यादी संस्थांचा सहभाग होता.

या कार्यक्रमास आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, गणेश बोत्रे, सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेनंदमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बोरकर सर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तांदळे मॅडम, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्तार अधिकारी तुषार साळुंके व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचबरोबर वडगाव ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासक सोनाली पवार, ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर /साबळे, गावातील महिला बचत गट प्रमुख नूतन बवले, माजी ग्रामपंचायत सदस्य योगिता बवले, ग्राम रोजगार सेवक निशा बवले, क्लार्क गोरक्ष बवले, ऍड. शाम बवले, सोपान बवले, जयहरी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष संतोष गव्हाणे, महिला उपस्थित होते. अहवाल वाचन प्रा. धनंजय लोखंडे, डॉ. दणाने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अपर्णा साबाणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. चंद्रशेखर वलव्हणकर यांनी केले.

पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीने वडगाव घेनंद गावाच्या जलसुरक्षा आराखड्याला मंजूरी देऊन नैसर्गिक स्त्रोत बळकटीकरण करण्याचे काम हाती घेतले. स्वर्गीय आमदार नारायण पवार यांच्या कालावधीत पाच कोपरा व पाच सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम झाले होते. परंतु नोंदवहीत नोंदी नव्हत्या. सन २०२४ च्या ग्रामसभेचा ठराव करून त्या नोंदी दफ्तरी नोंद करण्यात आल्या. तदनंतर बंधारे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

– सारिका वाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments