चाकणमध्ये रंगला गाण्याचा लॉंचिंग सोहळा. Quality

चाकण प्रतिनिधी दि. ३ –
महाराष्ट्रभर संगीत क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या “टॉपचा विषय क्वालिटी” या मराठी गाण्याचा व्हिडीओ अनावरण सोहळा चाकण (ता.खेड) येथे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. Quality
साधारण वर्षांपूर्वी फक्त ऑडिओ गाणे रिलीज झाले होते. त्या गाण्यानी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. निवडणूकांमध्येही गाणे चांगलेच ट्रेंडिंगला होते. ऑडिओ गाण्याच्या यशानंतर व्हिडीओ गाणे रिलीज करून प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी सादर केली आहे.
‘टॉपचा विषय क्वालिटी’ हे गाणे पाश एमजे यांनी दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे. गाण्याचे गीत मयूर गायकवाड (एमजी टटिंग) यांनी लिहिले आहे. डीजे शुभम यांनी संगीत दिले आहे. तर दिक्षा वाव्हळ यांनी सुरेल आवाजात गायले आहे. कलाकार म्हणून सुकन्या गायकवाड, सुनिल अवचिते आणि शिवन्या मानकर यांनी काम केले आहे. तर नृत्य दिग्दर्शन हे किशोर दळवी यांनी केले आहे. संतोष सरोदे यांनी गाण्याचे रचनाकार म्हणून चोख भूमिका वठवली आहे. Quality
कलाकारांसह मान्यवरांची मांदियाळी.
या कार्यक्रमाप्रसंगी पाटलांचा बैलगाडा फेम प्रकाश दिंडले, निवेदक/ संगीतकार विशाल शेलार, काँग्रेस खेडतालुका अध्यक्ष चंद्रकांत गोरे, निवेदक कराळे सर, शिवछत्रपती पतसंस्था अध्यक्ष बाळासाहेब मुळे, चाकण नगरपरिषद नगरसेविका विजया तोडकर, गायक प्रथमेश साळुंखे, तबलावादक हर्षल गोरे, माजी मुख्याध्यापक विजय तांबे, मयूर अडागळे, शिवगंधार स्टुडिओ राहुल कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. गाण्याच्या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन हे काँग्रेस खेड तालुका सचिव गौतम आव्हाळ यांनी केले होते. Quality
हे ही वाचा.
*खराबवाडी गायरान जमीन प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला दणका; जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांसह ग्रामपंचायतीला न्यायालयाची अवमान नोटीस!*












