वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. Nanapatekar

चाकण प्रतिनिधी दि.८ –
“कुणी घर देता का घर?, एका तुफानाला कुणी घर देता का?, एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय. जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय. कुणी घर देता का घर?”
अशा संवाद शैलीने आणि बहारदार अभिनयाने सिनेमागृहात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोवा येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. Nanapatekar
♦ नानांचा जीवनप्रवास
नानांचे मूळ नाव विश्वनाथ गजानंद पाटेकर असे होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. नानांचे वडील गजानंद पाटेकर हे व्यापारी होते. तर आई निर्मला पाटेकर ह्या गृहिणी होत्या. नाना हे १३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची व्यवसायात फसवणूक झाली आणि त्यांचा व्यवसाय बुडाला. कुटुंबावर आर्थिक संकट ओढवल्याने लहान वयातच कष्टाची कामे करावी लागली. मुंबई येथे काम करत असतानाच मुंबईच्या प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. Nanapatekar
♦ चित्रपट सृष्टीतील असामान्य अभिनेता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयामध्ये नशीब आजमावण्यासाठी रंगभूमीकडे मोर्चा वळवला. ‘हमीदाबाईची कोठी’ आणि ‘पुरुष’ यांसारख्या नाटकांमध्ये दर्जेदार अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली. या नाटकांमधील साकारलेल्या भूमिकांनी विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरु केला. सन १९८६ साली आलेल्या “अंकुश” चित्रपटाने विशेष ओळख मिळाली. परिंदा (१९८९), ‘प्रहार’ (१९९१), ‘तिरंगा’ (१९९२), ‘क्रांतिवीर’ (१९९४) खामोशी (१९९६), अग्निसाक्षी (१९९६), वेलकम (२००७), अब तक छप्पन (२००४), अपहरण (२००५), राजनीती (२०१०) या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. Nanapatekar
मराठी चित्रपटातील अजरामर चित्रपट ‘नटसम्राट’ मध्ये अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारली. या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्याचबरोबर डॉ. प्रकाश आमटे (२०१४), पक पक पकाक (२००८), आपला माणूस (२०१८) असे दर्जेदार मराठी सिनेमे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. Nanapatekar
♦ विविध पुरस्काराने सन्मानित.
अभिनय क्षेत्रात ठसा उमटवल्याबद्दल २०१३ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सन १९९५ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. Nanapatekar
♦ सामाजिक कार्यातही ठसा.
नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबत सन २०१५ मध्ये ”नाम फाउंडेशन”ची स्थापना केली. या फाउंडेशनमार्फत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांना आधार देण्याचे सामाजिक काम केले. Nanapatekar
हे ही पहा.
खेडच्या बाजार समितीवर अनुभवानुसार पदोन्नती मिळणार.









