Saturday, November 14, 2026
spot_img
Home लोकल न्यूज Annual meeting : ग्रँड सेंट्रल सोसायटीची वार्षिक सभेत हायवोल्टेज ड्रामा. अध्यक्षांनी सभा...

Annual meeting : ग्रँड सेंट्रल सोसायटीची वार्षिक सभेत हायवोल्टेज ड्रामा. अध्यक्षांनी सभा अर्धवट सोडल्याचा आरोप

0
25
Annual meeting

सलग तीन बैठकांना गैरहजर सदस्यांवर कारवाईची मागणी. Annual meeting

चाकण प्रतिनिधी दि.२९ :

चाकण (ता.खेड) येथील द ग्रँड सेंट्रल कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत हाय व्होल्टेज ड्रामा घडल्याचे पाहायला मिळाला. ही सभा रविवारी (दि.२७) गोंधळात पार पडली. सभेदरम्यान कमिटी मधील १६ सदस्यापैकी फक्त ११ सदस्य मीटिंगसाठी उपस्थित होते. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देता अध्यक्ष दीपक कौटकर सभा अर्धवट सोडून निघून गेले असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. अध्यक्ष हे जमा-खर्चाची माहिती देण्यास तसेच कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले. Annual meeting

सलग तीन बैठकीना सभासद गैरहजर. 

संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीनुसार, समितीचा जो सदस्य रजा न घेता समितीच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहतो, त्याचे समिती सदस्यत्व संपुष्टात येते. व्यवस्थापक समितीने आपल्या पहिल्याच बैठकीत याबाबत ठरावही केला होता. मात्र काही समिती सदस्य सलग तीन किंवा त्याहून अधिक बैठकांना गैरहजर असल्याचे समितीच्या इतिवृत्त पुस्तकातून दिसून आल्याचे सभासदांनी सांगितले. सभेतील ऐनवेळच्या विषयांमध्ये उपस्थित सभासदांनी बहुमताने उपविधीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यांनी संबंधित सदस्यांची नावे जाहीर करावीत आणि त्यांनी रजा घेतली असल्यास तिचा पुरावा दाखवावा, अशीही मागणी केली. मात्र अध्यक्षांनी नावे जाहीर केली नाहीत आणि रजेचा कोणताही पुरावा दिला नाही. उलट संबंधित सदस्यांना आणखी एक संधी देण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. सभासदांनी आग्रह धरल्यावर “सभा संपली” असे जाहीर करून ते सभास्थानातून निघून गेले, असे सभासदांनी सांगितले. यामध्ये अध्यक्षांचे काही हित संबंध व आर्थिक व्यवहार आहेत की काय? असा प्रश्न सभासदांना पडला आहे. Annual meeting

यामुळे सभासदांनी ऐनवेळच्या चर्चेसाठी दिलेल्या लेखी अर्जांवर चर्चाच होऊ शकली नाही. आता या प्रश्नांसाठी पुढील वार्षिक सभेची वाट पाहावी लागणार असल्याने संस्थेच्या ३४२ सभासदांची गैरसोय झाली आहे, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अंदाजपत्रकाचा तपशील सभेत मांडला गेला नाही, तरीही तो मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले, असा आक्षेपही सभासदांनी घेतला आहे. Annual meeting

“सभेत बहुमताने केलेली मागणी डावलून अध्यक्षांनी सभा अर्धवट सोडली. उपविधीचे तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्याचे, पालन व्हावे एवढीच आमची मागणी आहे,” असे एक मुखाने सभासदांनी सांगितले. Annual meeting

सोसायटीचे निर्णय जर अध्यक्ष हुकूमशाही पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर सोसायटीची मीटिंग फक्त नावाला घेऊन कोणाची हितगुज सांभाळतात याबाबतीचा सर्वात मोठे प्रश्नचिन्ह सोसायटीतील सर्व गाळाधारकांना पडले आहे. Annual मीटिंग

सहाय्यक निबंधकाकडे तक्रार.

या प्रकाराबाबत खेड येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सभासदांनी सांगितले. प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणीही ते करणार आहेत. Annual meeting

हे ही पहा. 

ग्रँड सेंट्रल सोसायटीच्या सभेत राडा.! सभा अर्धवट सोडून, अध्यक्ष पळाला? सभासदांचे गंभीर आरोप…

https://youtu.be/TvT37bOgXq4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here